Ad will apear here
Next
विक्रम फडणीसचा पुढचा सिनेमा स्मृतिभ्रंशावर
दुसरा चित्रपटही असणार मराठी
विक्रम फडणीसमुंबई : २०१७मध्ये ‘हृदयांतर’  या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश केलेला सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस याने आपल्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याचा दुसरा चित्रपटही मराठीच असून तो ‘विसरभोळेपणा आणि स्मृतिभ्रंश’ या संकल्पनेवर आधारित असेल, असे त्याने सांगितले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विक्रमने आपल्या दुसऱ्या चित्रपटाबद्दल माहिती दिली. दुसरा चित्रपटही मराठीच असून पुढील महिन्यात त्या चित्रपटाच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे त्याने सांगितले. याबाबत पुढे सांगताना तो म्हणाला, ‘या चित्रपटातून मी विसरभोळेपणा आणि स्मृतिभ्रंश (अल्झायमर्स आणि डिमेन्शिया) यावर आधारित एक कथा सर्वांसमोर घेऊन येत आहे. ही कथा मी लिहिली असून ती माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळची आहे. त्यामुळे मी या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. व्यावसायिक, कलात्मक किंवा ‘क्लास आणि मास’साठी असलेला हा सिनेमा असेल का नाही हे मी सांगू शकणार नाही. मी केवळ लोकांच्या माझ्याकडून असलेल्या जादुई अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न यातून करत आहे.’ 

आपल्या आगामी चित्रपटाबाबत आपण खूप भावनिक असल्याचे विक्रमने म्हटले आहे. चित्रपटाबाबत सांगताना विक्रमने आपल्या नवीन वर्षातील पहिल्या फॅशन शोबद्दलही सांगितले आहे. येत्या दोन फेब्रुवारीला मुंबईत होत असलेल्या त्याच्या या शोबद्दल तो खूप उत्सुक आहे. वर्षातील पहिला शो हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो आपली पुढची वर्षभराची दिशा ठरवतो, असे सांगताना आपण या शोबाबत खूप आनंदी असल्याचेही विक्रमने सांगितले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZJLBW
Similar Posts
लक्षवेधी ‘डोंबिवली रिटर्न’ ‘डोंबिवली फास्ट’मधून अभिनेता संदीप कुलकर्णीने रंगवलेला मुंबईतील सामान्य माणसाचा चेहरा लक्षात राहणारा ठरला. अशाच एका भूमिकेत ‘डोंबिवली रिटर्न - जे जातं.. तेच परत येतं?’ या आगामी चित्रपटातून संदीप पुन्हा आपल्यासमोर येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रकाशित झाला असून संदीप या चित्रपटात अनंत वेलणकर या भूमिकेत दिसणार आहे
कौशल्यविकासातून समृद्धीकडे; वैशाली नाईक बनली यशस्वी फॅशन डिझायनर पुणे : राष्ट्रीय कौशल्य विकास मोहिमेचा चौथा वर्धापनदिन १५ जुलै २०१९ रोजी साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरू केलेल्या या योजनेचा लाभ देशातील खूप जणांनी घेतला आहे. पुण्यातील वैशाली नाईक या तरुणीनेदेखील या योजनेचा लाभ घेऊन आपल्या आयुष्याला नवा आकार दिला आहे.
जिद्दीची वीण घालून ‘तिने’ साकारले स्वप्न! पुणे : मुलींसाठी शिक्षणाची कवाडे खुल्या करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा लढा सार्थ ठरवला आहे आणखी एका सावित्रीने. शेतमजुरी करून आयुष्य जगणाऱ्या, कुडाच्या घरात राहणाऱ्या कुटुंबातील सावित्री बाळासो ममदापुरे आज एका मोठ्या टेक्स्टाइल कंपनीत फॅशन डिझायनर म्हणून काम करत आहे. तिची जिद्द तिला इथपर्यंत घेऊन आली आहे
‘आरबीके’च्या विद्यार्थ्याचे यश मुंबई : आर. बी. के. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये सातवीत शिकणाऱ्या आदित्य श्रीवास्तव या विद्यार्थ्याला ‘नॅशनल अचिव्हर्स अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. एक हजार रुपये, ‘मॅप माय स्टेप डॉट कॉम’चे प्रीपेड स्क्रॅच कार्ड, सीडी, सुवर्णपदक व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याने नॅशनल लेव्हल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language